Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानापूर्वी 30 लाखांची रोकड जप्त, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमची (SST) कारवाई (Videos)

मावळ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maval Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय आणि अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पिंपरी चिंचवडमधील मावळ लोकसभा मतदारसंघात 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (Static Surveillance Teams (SST) ही कारवाई केली आहे. पथकाने एका कारमधून 30 लाखांची रोकड जप्त केली आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.(Maval Lok Sabha)

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एसएसटीने एका कारमधून 30 लाखांची रोकड जप्त केली. ही रक्कम आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये पोलीस अधिकार आणि एसएसटी पथकाचे अधिकारी कारची तपासणी करताना दिसत आहेत, ज्यातून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

एसएसटी टीम म्हणजे काय?

निवडणुकीच्या दरम्यान मतदारसंघात प्रचारासाठी होणारा अतिरिक्त खर्च, रोख किंवा लाचेच्या स्वरुपात वाटप, असमाजीक घटक किंवा अवैध शस्त्रे, दारुगोळा आणि दारुची वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष पथके तयार केली जातात. त्यापैकी एक पथक म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, यामध्ये एक मॅजिस्ट्रेट आणि प्रत्येक टीमध्ये तीन किंवा चार पोलीस कर्मचारी असतात. ते नेमून दिलेल्या चेकपोस्टवर काम करतात. क्षेत्राच्या संवेदनशीलतेवर अवलंबून काही एसएसटीमध्ये सीपीएफ कर्मचारी देखील असू शकतात. मोठ्या प्रमाणात रोकड, अवैध दारू, लाच, शस्त्रात्रे आणि दारुगोळा किंवा असमाजिक घटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एसएसटी जिल्हा आणि राज्यातील प्रमुख रस्ते आणि सीमेवर चेकपोस्ट लावले आहेत. तपासणीदरम्यान संपूर्ण प्रक्रियेचे शूटिंग करण्यात येते.

उर्से टोलनाक्यावर 50 लाख जप्त

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर 50 लाखांची रोकड जप्त केली होती.
शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक उर्से टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना त्यांना मुंबईहून पुण्याकडे
जाणाऱ्या एसयूव्ही मधून रोकड सापडली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाहीर झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Election Commission Of India | मतदानाची टक्केवारी अचानक वाढवली? देशातील हा प्रकार धक्कादाय, संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Sharad Pawar On PM Narendra Modi | शरद पवारांनी केली मोदींची नक्कल, म्हणाले, ”जातील तिथं मोदी स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली…”