MC Stan | बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन झाला मालामाल; अ‍ॅमेझॉनसह मिळाल्या 20 ब्रँडच्या ऑफर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच बिग बॉसचा 16 व्या पर्वाचा विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. मराठमोळ्या शिव ठाकरेला टक्कर देत त्याने हे विजेतेपद मिळवले. एमसी स्टॅनला सर्वाधिक मत मिळाल्याने त्यांनी बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. आता बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या (MC Stan) लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर त्याची लोकप्रियता आणि फॅन फॉलोईंग पाहता त्याला आता अनेक ब्रँडचे ऑफर ही मिळाल्याचे समोर आले आहे.

 

बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनचे नशीब उजळले. आता ॲमेझॉन मिनी टीव्हीची ऑफर त्याला मिळाली असून त्याबरोबर त्याने करार ही केला आहे. याशिवाय आणखीन 20 ब्रँडची ऑफर ही त्याला मिळाली असल्याची माहिती एमसी स्टॅनचे मॅनेजर अपूर्व भटनागर यांनी दिली आहे. पहिल्या दिवसापासूनच एमसी स्टॅनने घरात आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला स्टॅन त्याच्या हटके स्टाईलमुळे देखील चाहत्यांच्या पसंतीस येत होता. तर टॉप 2 मध्ये स्टॅन आणि शिवची ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.

एमसी स्टॅन हा बिग बॉसच्या घरातील चेहऱ्यांपैकी एक ओळखला जाणारा चेहरा होता.
आजवर स्टॅनने (MC Stan) आपल्या रॅपने सर्वांना वेड लावले होते.
बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर देखील अनेक नवनवीन विक्रम कोरले आहेत.
एमसी स्टॅन बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे.
बिग बॉसच्या चमकणाऱ्या ट्रॉफी बरोबरच त्याला 31 लाख 80 हजार रुपये त्याचबरोबर Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून देण्यात आली.
तर बिग बॉस मधून मिळालेल्या पैशातून आईसाठी घर घेणार असल्याचे स्टॅन यांनी सांगितले आहे.

 

Web Title :- MC Stan | bigg boss 16 winner mc stan got 20 brands offer including amazon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना