MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : ‘बिग बॉस 16’ च्या विजयानंतर एमसी स्टॅन (MC Stan) हा खूपच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीने तर त्याने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉसच्या विजयानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याने एका मुलाखतीत बिग बॉसचा प्रवास आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी (MC Stan) धक्कादायक विधान देखील केले आहे जे सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

आज एमसी स्टॅनचे अनेक चाहते आहेत. एमसी स्टॅनने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील आजपर्यंतचा प्रवास उघडपणे सांगितला आहे. लहानपणापासून झालेली त्याची जडण घडण अनेक परिस्थितीत तो जगला यावेळी त्यांनी मिळवलेले शिक्षण आसपास घडणारी हिंसा, गुन्हेगारी विश्व याबद्दल देखील स्टॅनने मोकळेपणाने भाष्य केले आहे. तर यावेळी त्याने काही लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला होता याचाही खुलासा केला आहे.

यावेळी बोलताना स्टॅन (MC Stan) म्हणाला,” एकदा आम्ही आमच्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होतो आणि अचानक काही लोक तिथे आले आणि त्याला मारण्यास सुरुवात केली.
काहींनी त्याच्या मानेवर तलवारीने वार केला तर काहींनी त्याच्या डोक्यात वार केला.
हे सर्व काही आमच्या समोरच घडत होतं. अशा गोष्टी माझ्या बाबतीत देखील दोन ते तीन वेळा झाल्या आहेत.
पी-टाऊनमधील काही लोकांनी मला मारण्याची धमकी दिली आणि तशी त्यांची इच्छा देखील होती त्यांनी तसा
प्रयत्न देखील केला होता पण देवाच्या कृपेने मी दरवेळी यातून सुखरूप वाचलो”.
एमसी स्टॅनच्या या वक्तव्यानंतर त्याची ही मुलाखत सध्या खूपच चर्चेत आली आहे.
त्याच्या या बोलण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या या वायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केले आहेत.

Web Title :- MC Stan | mc stan said some people tried to kill him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Maharashtra Budget Session 2023 | शिवसेनेनं बजावला 55 आमदारांना व्हीप, भास्कर जाधवांचे टीकास्त्र म्हणाले- ‘अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही’