Medha Kulkarni-Pune BJP | प्रा. मेधा कुलकर्णी राज्यसभेवर? ‘या’ कारणामुळे चर्चेला उधाण

ही शक्यता गृहीत धरल्यास पुणे लोकसभेसाठी भाजपकडून …… उमेदवाराचा विचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Medha Kulkarni-Pune BJP | राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या जागांसाठी फेब्रुवारीअखेर निवडणुक होणार असून यामध्ये राज्यातील सहा जागांचा समावेश आहे. विशेषत: सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांच्या वाट्याला पाच जागा जाणार असून मात्र अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. अशातच भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी आज महापालिकेकडे Pune Municipal Corporation (PMC) ‘नो ड्यूज’ सर्टीफिकेटसाठी अर्ज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपने प्रा. कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्यास आगामी लोकसभेच्या उमेदवारीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यसभेच्या रिक्त पदांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणुक होत आहेत. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणुक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. आमदारांचे बलाबल लक्षात घेता भाजप आणि मित्र पक्षांचे ५ उमेदवार विजयी होतील. तर कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या वाटयाला एक जागा राहील. परंतू सध्याचे फोडाफोडीचे राजकारण पाहाता सहाव्या जागेवरही भाजप उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, भाजपने अन्य राज्यातील उमेदवारांची घोषणा केली असली तरी काही ‘दिग्गजांचे’ प्रवेश सुरू असल्याने आजपर्यंत राज्यातील एकही उमेदवार घोषित केलेला नाही. अशातच आज कोथरूडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तातडीने ‘नो ड्यूज’ सर्टीफिकेटच्या मागणीसाठी अर्ज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकप्रतिनिधींना उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानीक स्वराज्य संस्थांची कुठलिही देणी देणे बाकी नसल्याचे सर्टीफिकेट आवश्यक असल्याने पुण्यातून त्यांच्या एकमेव मागणी अर्जामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार गिरीश बापट यांचे मागीलवर्षी निधन झाले. परंतू साधारण वर्षभराचा कालावधी शिल्लक असतानाही पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणुक झालेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आतापर्यंत पुणे लोकसभा, राज्यसभा अथवा विधानसभा, विधान परिषदेमध्ये ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघाच्या आमदार प्रा. कुलकर्णी यांचा पत्ता कट करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी दिली. तर कसबा मतदारसंघामध्ये तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. दुर्देवाने टिळक यांचेही निधन झाले. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राज्यात महायुतीचे सरकार असतानाही कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला.

या पार्श्‍वभूमीवर ‘ब्राम्हण’ समाजाचे प्रतिनिधीत्व राखण्यासाठी भाजपकडून प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्य सभेच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्याने त्यांनी ‘नो ड्यूज’ सर्टीफिकेटसाठी अर्ज केल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही शक्यता गृहीत धरल्यास लोकसभेसाठी भाजपकडून मराठा समाजातील उमेदवाराचा विचार होउ शकणार आहे, असे जाणकार बोलू लागले आहेत. यासंदर्भात प्रा. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होउ शकला नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API And Two Lady Cops Suspended In Pune | पुणे: सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) दामिनी पथकातील 2 महिला पोलिस तडकाफडकी निलंबीत

Shiv Sena MP Sanjay Raut | अशा पद्धतीने ते २०० पार सुद्धा जाणार नाहीत, संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

Ashok Chavan | भाजपा प्रवेशानंतर आदर्श घोटाळ्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, ”हा चिंतेचा विषय…”