प्रजासत्ताकदिनी BJP नेत्याचे आवाहन – ‘हम दो हमारे पांच’चा संकल्प करा, मुलांना हत्यारं खरेदी करायला आणि चालवायला शिकवा

मेरठ : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एका नेत्याने ध्वजारोहन दरम्यान हम दो हमारे पांच ची घोषणा दिली. भारतीय जनता पार्टीच्या व्यापार सेलचे प्रदेश संयोजक विनीत अग्रवाल शारदा एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी असेही म्हटले की, एका मुलाला शस्त्र खरेदी करायला आणि चालवायलाही शिकवा.

भाजपाच्या या नेत्याने म्हटले, जोपर्यंत हाम दो हमारे पांच चा नियम बनत नाही तोपर्यंत हम दोन हमारे पाचचा सर्वांनी संकल्प करावा. हा पुढारी म्हणाला, जोपर्यंत नियम होत नाही तोपर्यंत हम दो हमारे दो चा सिद्धांत समाप्त केला पाहिजे. त्यांनी सरकारला आवाहन केले की, एक तर सरकारने असे करावे किंवा आपल्या सर्वांना याचा संकल्प घ्यावा लागेल.

या विद्वान भाजपा नेत्याने जन्माला घातलेल्या पाच मुलांपैकी कुणाला कोणत्या कामाला लावले जावे, हे सुद्धा उपस्थित लोकांना सांगितले. हा नेता म्हणाला, शिक्षण घेतलेल्या मुलाला राजकारणात पाठवा. एका मुलाला मान मर्यादा इज्जत वाचवण्यासाठी शस्त्र खरेदी करणे आणि ते चालवायला शिकवा. एका मुलाला लष्करात पाठवा. आणि एका मुलाला व्यापारात लावा आणि एका मुलाला आयएएस-आयपीएस बनवून भारताची सेवा करायला सांगा.

शारदा याने म्हटले की, आज लोकशाहीचा सर्वात पवित्र दिवस आहे आणि या दिवशी एक तर हम दो हमारे दो किंवा हम तीन हमारे तीन चा नियम सरकारने सर्वांसाठी बनवावा. किंवा आज आपण सर्वांनी संकल्प करावा की, सर्वजण हम दो हमारे पाच चे पालन करू.

दशरथ राजाला चार मुलं
हा नेता म्हणाला की, महाराजा दशरथाला चार मुलं होती. जर राजा दशरथाला चार मुलं नसती तर रावणाचे राज्य नष्ट झाले नसते. यासाठी देशाला गरज आहे हम दो हमारे पाच ची.

सावत्र व्यवहार होऊ नये यावर बोलताना हा महान नेता म्हणाला की, जर असे झाले नाही तर भारत माता पुन्हा रडेल. पुन्हा भारत माता साखळदंडात जखडली जाईल आणि पुन्हा दुसर्‍या पाकिस्तानची मागणी होईल. यासाठी नाही भारत अखंड आहे. भारत मातेला प्रणाम करतो आणि हम दो हमारे पांच च्या सिद्धांताला सलाम करतो.