मोस्ट वॉन्टेड ‘हाजी सईद’कडून ‘FB’ वर पोस्ट, आला ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मेरठ पोलिसांना मोस्ट वॉन्टेंड हिस्ट्रीशीटर हाजी सईदला शिमलामधून अटक केली आहे. हाजी सईदने शिमलामधून फेसबूकवर फोटो पोस्ट केला होता, ज्यात तो याक वर बसलेला होता. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या.

हिंसा पसरवल्याचा आरोप
उत्तर प्रदेशात अनेक दुर्घटनांमध्ये हिंसा निर्माण करणाऱ्यांमध्ये त्याचा मुख्य समावेश होता. मेरठमध्ये मार्च आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात हिंसा निर्माण केल्या कारणाने त्याला आरोपी ठरवण्यात आले होते, परंतू तो बऱ्याच काळापासून फरार होता. यानंंतर पोलिसांनी त्याला मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समावेश केला.

सोशल मिडियावर हाजी सईद शिमल्यात असलेला फोटो समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि एका शिमल्याला पाठवलेल्या टीमने त्याला अटक केली. मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले, फेसबूकवर पोस्ट केलेल्या फोटोच्या लोकेशनच्या आधारे हाजी सईदचा पत्ता लागला. त्यानंतर लोकेशन ट्रेस करुन त्याला अटक करण्यात आली. तो जूनमध्ये झालेल्या एका हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपी आहे.

या घटनेतील आरोपी –
मेरठमध्ये भूसामंंडई परिसरात अवैध ताबा हटवण्यासाठी पोलिसांना विरोधाचा सामना करावा लागला. यानंतर उफळून आलेल्या हिंसेमध्ये २०० पेक्षा अधिक घरे जाळण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी अनेकांना अटक केली होती मात्र काही जण फरार घोषित करण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –