माळी समाज संपादक मंडळाची बैठक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – स्थानिक सर्वशाखीय माळी महासंघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या २३ वे राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंध विवाहत्सुकांचे परिचय महासंमेलनाची जय्यत तयारी सुरू असून ऋणानुबंध ह्या परिचय पुस्तकाचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुस्तकाच्या संपादक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेशातील गासे, कासे, सैनी, मरार, फूल, कोसरे, लोणारी, झाडपी, वनमाळी आदी शाखांतील दोन हजारांच्यावर विवाहात्सूक उपवर युवक-युवती तसेच विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, विधूर, दिव्यांग आदिंनी नोंदणी केली असल्याचे वऱ्हाड विकास येथील संपादक मंडळाच्या बैठकीत सुचित करण्यात आले. ऋणानुबंध ह्या परिचय पुस्तकाची भारताबाहेरील दुबई, बँकॉक, ओमेन, अमेरिका येथील माळी समाजबांधवांनी अनिवार्यता व्यक्त केली.

भारतातील सर्वाधिक विवाहात्सुकांची नोंदणी झालेला व भारतातील सर्वात मोठा आणि संपूर्ण माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या महामेळाव्याच्या ऋणानुबंधसाठी प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रा.एन.आर.होले, प्रा.साहेबराव निमकर, वसंत भडके, मधुकर आखरे, डी.एस.यावतकर, गोविंद फसाटे आदींचे संपादक मंडळ गठित करण्यात आले असून बबनराव पाटील हे प्रकाशत आहेत.