Megha Ghadge | मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; कॅप्शनने वेधले सर्वांचेच लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन : Megha Ghadge | प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, नृत्यांगना आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते. मेघा घाडगे ही कायमच चर्चेत असते. नुकताच तिने तिचा एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे ती चर्चेत होती. मेघा सोशल मीडियावरदेखील नेहमी सक्रिय दिसते, तर आता पुन्हा एकदा तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

मेघा घाडगे कायमच विविध फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वतःचे दोन हसतानाचे फोटो शेअर केले आहेत, तर त्याला सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे. सध्या तिचे हे कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Megha Ghadge)

कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, “दुसऱ्याच्या आनंदात आनंदी राहणारे आणि दुःखात दुःख होणाऱ्या
माणसांमध्ये माणुसकीची लक्षणे असतात आणि दुसऱ्यांच्या दुःखात आनंदी होणाऱ्या आणि सुखात जळणारे
मात्र विकृत प्रवृत्तीची माणसं असतात. म्हणूनच नेहमी हसत राहिले पाहिजे”.
सध्या तिची हि पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मेघा घाडगे नेहमीच आपल्या लावणीने चाहत्यांची मने जिंकत असते.
बिग बॉसच्या घरात देखील तिला चाहत्यांनी पसंती दर्शवली होती आणि तिच्या प्रत्येक पोस्ट व्हिडिओला
चाहते भरभरून प्रेम करत असतात.

Web Title :-Megha Ghadge | actress megha ghadge shared special positive thinking instagram post goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

CM Eknath Shinde | फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची दखल नरेंद्र मोदींनी घेतली; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती