CM Eknath Shinde | फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची दखल नरेंद्र मोदींनी घेतली; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावर गाडी चालवून या महामार्गाची तपासणी केली होती. या टेस्ट ड्रायव्हिंगचा अनुभव सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या टेस्ट ड्राइव्हची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती दिली. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

 

समृद्धी महामार्गावर फडणवीस-शिंदेंनी टेस्ट ड्राइव्हवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग होते. ही टेस्ट ड्राइव्ह केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी आपल्याला समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राइव्हचा अनुभव विचारल्याचे शिंदेंनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचं कौतुक केले.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी याआधी समृद्धी महामार्गावर ड्रायव्हिंग केलं आहे. त्यामुळे त्या दिवशी फडणवीसांना ड्रायव्हिंगचा मूड होता. ते (देवेंद्र फडणवीस) म्हणाले, गाडी मी चालवतो तुम्ही बाजूला बसा. आता जर ड्रायव्हिंग न येणारा माणूस बाजूला बसला असेल तर त्याला भीती अजिबात नसते. पण मला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे मला थोडी भीती वाटली होती. कितीही झालं तरी मनात धाकधूक असते. पण फडणवीसांनी कमालाची ड्रायव्हिंग केलं. ते तर पट्टीचे ड्रायव्हर निघाले.”

शिंदेंनी सांगितले, ” त्यानंतर मी आता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत भेटलो तेव्हा त्यांनीही समृद्धीवरील टेस्ट ड्राइव्हबाबत विचारलं.
मला मोदीजींनी ‘कैसा रहा सफर, किधर है आपके साथी’ असं मला आवर्जून विचारलं.”
तसेच समृद्धी महामार्गासाठी पंतप्रधान मोदीही उत्सुक असल्याचे शिंदे म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्राला हा समृद्धी महामार्ग दोन्ही हातांनी भरभरून देणारा मार्ग ठरणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | narendra modi also asked me about devendra fadnavis driving said cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Zee Marathi | झी मराठीवरील ‘हा’ शो घेणार प्रेक्षकांचा निरोप ; तर ‘या’ नवीन दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Chandrakant Patil | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

Malaika Arora | अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावले खडे बोल; म्हणाली “तो मर्द आहे…”