ट्रम्प यांच्या पाठोपाठ मेलानिया यांनी देखील ‘फस्ट लेडी’ची ‘परंपरा’ काढली मोडीत

वाशिंग्टन डि सी : अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे उद्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत असताना मावळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित राहणार नाहीत. त्याचप्रमाणे राष्ट्राध्यक्षांचा व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी फस्ट लेडीने नवीन फस्ट लेडीला व्हाईट हाऊसमधील राष्ट्राध्यक्षांचा दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील खासगी घरामध्ये आमंत्रित करण्याची परंपरा आहे. ही परंपरा मेलानिया ट्रम्प (Melania Trump) मोडीत काढणार आहे. त्यांनी व्हाईट हाऊसला निरोप देण्यापूर्वी पुढची फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले नाही.

अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहे. या कार्यक्रमात ट्रम्प सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मावळते राष्ट्राध्यक्षांशिवाय हा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीच्या दिवशी ट्रम्प पहाटे वॉशिंग्टन डिसीहून रवाना होणार आहेत. उपराष्ट्रपती माइक पेंस या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

ट्रम्प यांच्याप्रमाणेच व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी पुढच्या फस्ट लेडीला आमंत्रित करण्याची परंपरा मोडित काढणार आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या नागरिकत्वाबद्दल शंका घेतल्यानंतरही मिशेल ओबामा यांनी मेलनिया ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी आमंत्रित केले होते. नव्या फस्ट लेडीला व्हाईट हाऊसमध्ये बोलविण्याची मावळत्या फस्ट लेडीची ही अलिखित जबाबदारी अमेरिकेत मानली जाते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव जसा डोनाल्ड ट्रम्प यांना मान्य नाही़. त्याचप्रमाणे मेलनिया ट्रम्प यांनाही तो मान्य नसल्याचे यावरुन दिसत असल्याचे अमेरिकन नागरिकांच्या भावना आहेत.