‘सामन्याआधी मेसी २० वेळा टॉयलेटला जातो’; दिग्गज फुटबॉलपटू मॅरोडोनाची विखारी टीका

ब्राझील : वृत्तसंस्था – मेसी सामन्याआधी २० वेळा बाथरूमला जातो, असं म्हणत फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोना यांनी लिओनेल मेस्सीवर टीका केल्याचे समोर आले आहे. अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो यात श्रेष्ठ कोण हा वाद फुटबॉलप्रेमींसाठी नवीन नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी संघ निवडायचा असेल तर त्यासाठी रोनाल्डोपेक्षा मेसीला संघात स्थान देईन असे म्हटले होते. ‘मेस्सी सामन्याआधी २० वेळा बाथरूमला जातो, त्याला आपण लीडर कसं काय म्हणायचं’ असं म्हणत मॅरोडोना यांनी मेसीवर टीका केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’152020a5-d078-11e8-bcfb-735d9d49c276′]

मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार लिओनेल मेस्सीच्या खेळावर टीका करण्यात आली होती. राष्ट्रीय संघाकडून खेळताना मेसीवर प्रचंड दबाव असतो. मेसी सामन्याआधी २० वेळा बाथरूमला गेल्याने त्याच्या कामगिरीवर परिणाम होतो, अशी टीका मॅरोडोना यांनी केली आहे.

राष्ट्रीय संघाकडून खेळणारा आणि बार्सिलोना क्लबकडून खेळणारा मेस्सी हा वेगवेगळा असतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तोच मुद्दा मॅरोडोना यांनीही मांडला. बार्सिलोनाकडून खेळणारा मेसी अर्जेंटिनाकडून खेळताना वेगळा असतो. तो चांगला खेळाडू आहे. पण त्याच्या नेतृत्वगुण नाहीत. कोणताही सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधाराने आपल्या संघाचे मनोबल वाढवायचे असते. पण हा स्वतःच २० वेळा टॉयलेटला जातो, असे ते म्हणाले.

[amazon_link asins=’B075FY4RWK,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69eafd22-d07c-11e8-85bd-3b0842b87f91′]