सोशल मीडियातून मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव

वृत्तसंस्था

बार्सिलोना क्लबकडून खेळताना अद्वितीय, नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करणारा जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत विशेष कामगिरी करू न शकल्याने चहूबाजूंनी त्याच्यावर टीका होत होती. परंतु मंगळवारी लौकिक असा नायजेरिया वरती मैदानी गोल करत आपल्या नावाला साजेसा असा खेळ खेळला त्यामुळे मेस्सीपेमी सुखावले, तर सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या मेस्सीवरनी टीका होती.पण आयर्लंड विरुद्ध एक पेनल्टी किक हुकली, म्हणून मेस्सीला टार्गेट करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो ला इराणविरुद्ध पेनल्टी किकची संधी दवडल्याचा विसर कसा पडू शकतो, असं सवाल मेस्सीपेमी करत आहेत.

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मेस्सीची पेनल्टी किक अडवली होती, तो सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर क्रोएशिया बरोबरचा डाव ३-० असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता , अंतिम १६ संघांमध्येही स्थान न मिळविण्याची नामुष्की अर्जेंटिनावर ओढावतेय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण नायजेरियाविरुद्ध जिद्दीने विजय मिळवीत मेस्सी आणि त्याच्या टीम ने२-१ असा विजय मिळवीत अंतिम संघामध्ये प्रवेश केला. मेस्सीने पहिला गोल लांब अंतरावरून मिळालेला पास गुडघ्यावर घेऊन नायजेरियाच्या गोलजाळीचा वेध घेत नोंदविला या गोल नंतर मेस्सीप्रेमींनी आणि सहकाऱ्यांनी जल्लोष केला, त्यानंतर मात्र नायजेरियाने पेनल्टी किकद्वारे बरोबरी साधल्यानंतर सावध झालेल्या अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूंनी आणखी चूक करण्याचे कटाक्षाने टाळले.

अर्जेंटिनातर्फे दुसरा गोल करणाऱ्या मार्कोस रोजोने सामना संपल्यानंतर या गोलाचे श्रेय मेस्सीला दिले. यावरून कप्तान म्हणून मेस्सीचे महत्त्व अधोरेखित होते. मैदानात व मैदानाबाहेर उत्तम वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेस्सीचे असंख्य चाहते भारतात आहेत. गोव्यात केवळ मेस्सीसाठी अर्जेंटिनाला पाठिंबा देणारे फुटबॉलप्रेमी आता सुखावले आहेत.