Meta Company Crop Messaging App | मेटा कंपनीचा वापरकर्त्यांना मोठा धक्का; पुढील 45 दिवसात करणार ‘हे’ अ‍ॅप बंद

पोलीसनामा ऑनलाइन – Meta Company Crop Messaging App | जागतिक मार्केटमध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) व एलन मस्क (Elon Musk) यांच्या कंपनी एकमेंकाना शह देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. एलन मस्क यांनी आपल्या ट्वीटवर (Twitter) कंपनीचे नाव, लोगो असे अनेक बदल केले असून इंस्टाग्राम (Instagram) व फेसबुक (Facebook) या अ‍ॅप्लिकेशनला टक्कर देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. इंस्टाग्रामने देखील वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर आणले आहेत. ट्वीटर अर्थात X या प्लॅटफॉर्मवर आता युजर्सला व्हिडिओ व ऑडिओ कॉल करण्याचे भन्नाट फिचर एलन मस्क यांनी सुरु केले आहे. सर्वत्र या नवीन फिचरची चर्चा असून अनेक वापरकर्ते त्याच्या वापरासाठी उत्सुक आहे.

काही महिन्यांपूर्वी मेटा या कंपनीने ट्वीटरचे मार्केट कॅप्चर करण्यासाठी ‘थ्रेड’ हे अ‍ॅप (Thread App) आणले. आता मेटा कंपनीकडून युजर्सना मिळणारं एक खास अ‍ॅप कंपनीकडून येत्या 45 दिवसांत बंद करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. अ‍ॅप रिसर्चर एलेसेंड्रो पलुजी (Alessandro Paluzzi) यांनी मेटा कंपनीच्या धक्कादायक निर्णयाचा खुलासा करत फोटो देखील शेअर केला आहे. स्क्रीनशॉट शेअर करत मेटा कंपनी क्रॉप अ‍ॅप मेसेजिंगची सेवा (Meta Company Crop Messaging App) लवकरच बंद करणार असल्याचा दावा एलेसेंड्रो पलुजी यांनी केला आहे.

पुढील दोन महिन्यामध्ये मेटा कंपनीचे क्रॉप अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी बंद केले जाणार आहे. या अ‍ॅपद्वारे फेसबुक
आणि इन्स्टाग्रामवरील युजर्सना मित्रांसोबत चॅटिंग करता येत होते. 2020 साली मेटाने हे अ‍ॅप लॉन्च केले होते.
पारदर्शकपणे लोकांचा डेटाचं संरक्षण करुन सोप्या पद्धतीने चॅट करता यावी,
यासाठी कंपनीकडून क्रॉप अ‍ॅप मेसेजिंगची सुविधा लॉन्च करण्यात आली होती.
एखादा मेसेज आल्यास त्यासाठी अ‍ॅपमधून बाहेर न पडता तिथंच त्याला रिप्लाय देणं क्रॉप अ‍ॅपमुळे शक्य होते.
पूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर चॅटिंग करण्यासाठी दुसऱ्या अ‍ॅप्स इन्स्टॉल करावे लागत असे.
आता मात्र हे पुढील 45 दिवसांमध्ये बंद होणार असल्याचा दावा एलेसेंड्रो पलुजी यांच्याकडून करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर एलेसेंड्रो पलुजी यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
त्यांच्या पोस्टनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून (Meta Company Crop Messaging App) वापर करता
येणार नाही. तसेच पूर्वीची चॅट फक्त वाचण्यासाठी उपलब्ध असेल.
मित्रांसोबत बोलण्यासाठी नवीन चॅटिंग सुरू करावी लागणार आहे.
परंतु पलुजी यांनी केलेल्या दाव्याबाबत मेटा कंपनीने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेले नाही.
कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे व एलेसेंड्रो पलुजी याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे युजर्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loan Scheme | शहरात घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्त लोन, सरकारी स्कीम कधी येणार, जाणून घ्या