#MeToo : आरोप झालेल्यांसोबत काम करण्यास ११ महिला निर्मात्यांचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय चित्रपट उद्योगातील कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास, मेघना गुलजार, गौरी शिंदे, किरण राव, रीमा कागटी व झोया अख्तर यांच्यासह ११ महिला निर्मात्यांनी मी टू चळवळीत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या व्यक्तींबरोबर काम करणार नसल्याचे जाहिर केले आहे. महिला व चित्रपट निर्मात्या म्हणून आम्ही मीटू इंडिया चळवळीला पाठिंबा देत आहोत. ज्या महिलांचा लैंगिक छळ झाला त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभ्या आहोत. त्या महिलांनी जे धैर्य दाखवले त्याला आमचा सलाम.  यामुळे एका चांगल्या बदलास सुरुवात झाली आहे, असे या महिला निर्मात्यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac97fe98-d030-11e8-8be1-23d05da5ed91′]

या अकरा महिला निर्मात्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे, की कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित व समानतेचे वातावरण मिळाले पाहिजे. ज्या लोकांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत त्यांच्या समवेत आम्ही आता काम करणार नाही. इतरांनाही आम्ही तसेच करण्याचे आवाहन करीत आहोत. या निवेदनावर अलंकृता श्रीवास्तव, नित्या मेहरा, रुची नारायण व शोनाली बोस यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. मीटू चळवळीच्या पार्श्वभूमीवर चित्रपट उद्योगातील अनेक बडय़ा अभिनेते, दिग्दर्शकांवर आरोप झाले असून त्यांनी लैंगिक गैरवर्तन व छळवणूक केल्याचे काही महिला अभिनेत्रींनी स्पष्टपणे म्हटले आहे. नाना पाटेकर, रजत कपूर, सुभाष कपूर, आलोक नाथ, सुभाष घई, विकास बहल, कैलाश  खेर, साजिद खान, मुकेश छाब्रा, गायक रघु दीक्षित, वैरामुथु यांची नावे यामध्ये आहेत.

[amazon_link asins=’B07DF7P67R’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b372e89c-d030-11e8-94cb-a582fc142dca’]

दरम्यान, मी टू या महिलांच्या सोशल मीडियावरील मोहिमेमुळे देशभरात खळबळ उडाली असून केवळ बॉलिवूडच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. राजकारण, पत्रकारिता, उद्योग, शिक्षण, खेळ आदी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला या मोहिमेतून वाचा फोडली आहे. याच मी टू मोहिमेमुळे देशातील एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी याच प्रकरणातून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावरील आरोप निराधार आहेत. द्वेष भावनेतून हे आरोप करण्यात आले आहेत. माझ्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. आफ्रिका दौऱ्यावरून आल्यानंतर अकबर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. कोणतीही साक्ष न घेता आरोप करणं हा व्हायरल फिव्हर झाला आहे. आता मी भारतात आलो आहे. माझे वकील या तथ्यहिन आरोपांवरून कायदेशीर कारवाई करत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे वादळ का निर्माण केलं जातंय? त्यामागे काही अजेंडा आहे काय? असा सवाल करत अकबर यांनी पुन्हा विरोधी पक्षांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात