#MeToo : मलाही खूप त्रास सहन करावा लागला : रेणुका शहाणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मीटू मोहिमेअंगर्गत रोज नवनवीन प्रकरणे समोर येत असल्याने विविध क्षेत्रांमध्ये खळबळ उडत आहे. यामध्ये बॉलिवुड सर्वात पुढे आहे. आता रेणुका शहाणे यांनीही याबाबत वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपले मौन सोडत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रसंगाला सामोरे जावे लागले नाही अशी एकही महिला नाही. माझ्यासोबतही एकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला बरीच वर्षे झाली, मात्र मी अजूनही ही गोष्ट विसरले नाही, असे त्या म्हणाल्या.

मी देखील मीटू प्रसंगाला बळी पडले आहे. या सर्वातून सावरायला मला दीर्घ काळ लागला होता. मलाही खूप त्रास सहन करावा लागला असून मीटू ही प्रत्येक महिलेची कहाणी असून माझा मीटू मोहिमेला पाठिंबा दिला आहे. सिंटानेही अशा घटनांवर आळा घालण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत रेणुका शहाणे यांचाही समावेश असणार आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे राखी सावंत अडचणीत

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे राखी सावंत अडचणीत आली आहे. तनुश्रीबद्दल केलेले वक्तव्य राखीला महागात पडले असून या विधानांमुळे बौद्ध धर्माचा अपमान झाल्याचे म्हणत भीम आर्मीने राखीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राखी सावंतने नानांना पाठिंबा देत तनुश्रीचे आरोप खोटे असल्याचे म्हटले. नाना तनुश्री वादावर बोलताना तनुश्रीने टक्कल केले, ती अंमली पदार्थांचे सेवन करायची अशी विधाने राखीने केली होती. प्रत्यक्षात तनुश्रीने यावेळी बौद्ध धर्माच्या रिवाजाचे आचरण सुरू केले होते. त्यामुळे, राखीच्या या विधानामुळे बौद्ध धर्माचा अपमान झाल्याचे म्हणत भीम आर्मीने ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.