#MeToo : तुमचे सत्य लवकरच समोर येईल : हेअर स्टाईलिस्टचा बिग बींना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

सोशल मीडियावर महिलांनी सुरू केलेल्या मी टू मोहिमेने देशभरात खळबळ उडाली आहे. बॉलिवूड, राजकारण, मीडियासह अनेक क्षेत्र यामुळे हादरत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर सातत्याने बॉलिवूडला मी टूचे हादरे बसत आहेत. आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट सपना मोती भवनानीने इशारा दिला आहे.

मी टू मोहिमेविषयी सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानीने अमिताभ बच्चन यांच्यावर ट्विट केले आहे. सपनाने पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, आतापर्यंत सर्वात मोठं खोटं आहे. सर, पिंक चित्रपट आला आणि गेलाही. अशाप्रकारे तुमचा समाजसेवकाचा चेहराही लवकरच जाणार आहे. तुमचे सत्य सर्वांसमोर यायला वेळ लागणार नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c35f463-ce9e-11e8-968c-c3d64ba4ac47′]

अमिताभ यांनी सोशल मीडियावर म्हटले होते की, कोणत्याही महिलेसोबत गैरवर्तन होऊ नये. खास करुन तिच्या कामाच्या ठिकाणी. अशा घटनेची माहिती त्वरित आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. त्यानुसार योग्य पाऊल उचलले पाहिजे. तुम्ही तक्रार करु शकता किंवा कायद्याची मदतही घेऊ शकता. आपल्या समाजात महिला आणि लहानमुले असुरक्षित आहेत. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या देशातील महिला विविध क्षेत्रात कार्यरत हे पाहून आनंद होतो. जर आपणच त्यांना सुरक्षित ठेवू शकत नाही तर यात आपली चूक आहे.  अमिताभ यांनी केलेल्या याच वक्तव्याचा आधार घेत सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानीने अमिताभ यांना इशारा दिला आहे. सपना भवनानी यांनी नेमका कोणत्या विषयाबाबत इशारा दिला आहे, याविषयी सध्या चर्चा सुरू झाली आहे.

#MeToo: लवकरच कायदेतज्ज्ञांच्या समितीची स्थापना; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केल्यानंतर मी टू मोहीम देशात जोर धरू लागली आहे. याच मोहिमे अंतर्गत अनेक अभिनेत्री आणि महिला पत्रकारांनी, दिग्दर्शक आणि निर्माता पदावर असलेल्या महिलांनी लैंगिक छळ, गैरवर्तन, बलात्कार यांसारख्या अन्यायांना वाचा फोडली आहे. अभिनेता पियुष मिश्राचे नावही आता या यादीत समाविष्ट झाले आहे. नाना पाटेकर, आलोकनाथ या अभिनेत्यांवर आरोप झाल्यानंतर आता पियुष मिश्रांवरही अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत. नाना पाटेकर यांना सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने नोटीस बजावली आहे. तर आलोकनाथ यांना फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजने नोटीस बजावली आहे. अशात आता एका महिलेने पियुष मिश्रावरही आरोप केले आहेत.

[amazon_link asins=’B078BNQ313,B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbd3f093-cea0-11e8-a9a6-0feca30a6317′]