मेक्सिकोच्या प्राचीन मंदिरात सापडली 600 वर्ष जुनी सोनेरी गरुडाची ‘आकृती’ !

मॅक्सिको सिटी : मॅक्सिको सिटी येथे केलेल्या खोदकामात ग्रेट टेम्पल येथे तब्बल 600 वर्ष जुनी सुवर्ण गरुडाची आकृती आढळली आहे. मॅक्सिकोच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंथ्रोपोलॉजी एँड हिस्ट्रीचे रोडोल्फो एग्युलार यांच्या टीमने केलेल्या शोधकामातून ही आकृती सापडली.

सुवर्ण गरुडाची जी आकृती सापडली आहे ती एकप्रकारे संस्कृतीचा हिस्सा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ज्वालामुखीच्या शिलावर ही आकृती तयार झाली आहे. जी पिरॅमिडच्या आकारात मंदिराच्या खालच्या भागात सापडलेली सर्वात मोठी आकृती आहे. टेंप्लो मेयर हा एक मोठा साचा होता ते अजटेक धर्म आणि संस्कृतीच्या केंद्रात होता. या लोकांमध्ये या मंदिराला ब्रम्हांडाचे केंद्र मानले जाते. याला 15 व्या शतकातील सुरुवातील बनविण्यात आल्याचा अंदाज आहे. या गरुडाच्या आकृतीला जमिनीवर रेखाटण्यात आले. त्यानंतर त्यावर आणखी एक फ्लोअर आहे. त्यामुळे हे सर्व अद्यापही सुरक्षित आहे.

संस्कृतीचा हिस्सा : ही आकृती मॅक्सिको सिटी दोन भागातील रस्त्यावर आहे. जेव्हा हे बनविण्यात आले होते तेव्हा हेच मंदिर दक्षिणेकडील उताऱ्यावर होते. या गरुडाच्या आकृतीला इत्जकुऑटली किंवा ऑब्जीडियन म्हटले जाते. दरम्यान, हा संस्कृतीचा एक हिस्सा असून, त्याला एक पवित्र चिन्हही मानले जाते होते.