MHT-CET चे संभाव्य वेळापत्रक जाहीर, PCM-PCB ग्रुपच्या स्वतंत्र परीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार इंजिनिअरिंग आणि फार्मासी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा 13 ते 23 एप्रिल 2020 दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी करता यावी यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या 8 व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाच्या 6 अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

यावर्षीही पर्सेन्टाईल पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परिक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सीईटी सेलव्दारे तीन व पाच वर्षीय विधी (लॉ) बीई/बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए, बीएस्सी इटिग्रेटेड कोर्स या सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्र सीईटीसाठी जहीर केले आहे.

विविध सीईटींसाठी कोणत्या तारखेला अर्ज करायचे याची सविस्तर माहित संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ही माहिती वेळापत्रकात देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असं आवाहन सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

Visit : policenama.com