ICC World Cup 2019 : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनकडून भारतासह ICCची ‘खिल्‍ली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. यामुळे भारताच्या फायनलमध्ये खेळण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला. वर्ल्डकप सुरु होण्याआधी भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र या पराभवानंतर भारतीय संघासह अनेक भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांचा देखील चकनाचूर झाला.

त्यानंतर आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय संघाला डिवचले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीबरोबरच आयसीसीला देखील ट्रोल केले आहे. मायकल वॉन याने विराट कोहली याचा वर्ल्डकप आधी आयसीसीने ट्विट केलेला फोटो ट्विट करत यामध्ये आयसीसीला टॅग करत या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले कि, तिकीट प्लिज. त्याचा रोख हा भारतीय संघाच्या परतीकडे होता.

दरम्यान, त्याने हा फोटो आयसीसीच्या ट्विटर हॅण्डलवरून घेईन त्याला एडिट केले होते. आयसीसीने हा फोटो वर्ल्डकपच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यासामन्याआधी ट्विट केला होता.

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

 

 

Loading...
You might also like