‘या’ अभिनेत्यानं पत्नीला ‘खुल्लमखुल्ला’ केलं ‘KISS’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता मिलिंद सोमन आणि त्याची पत्नी अंकिता कुंवर सध्या चर्चेत आले आहेत. मिलिंद आणि अंकिता यांचा किसिंग व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. सध्या मिलिंद आणि अंकिता लेहला फिरण्यासाठी गेले आहेत. त्यांचा किसिंग व्हिडीओदेखील तिथलाच आहे. मिलिंदने हा व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे.

मिलिंदने आणि अंकिताला किस करतानाचा हा व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मिलिंद म्हणतो, “Fun time at Rohtang La on the way from Manali to Leh. jumping around at altitude is no fun unless it’s with someone you love.”

मिलिंद आणि अंकिताचे अशा प्रकारे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. 53 वर्षीय मिलिंद सोमन एक फिटनेस फ्रिक आहे. तो नेहमीच इतरांना फिटनेससाठी प्रेरणा देत असतो. मिलिंदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर फोर मोर शॉर्ट प्लिज या वेब सीरीजमध्ये तो झळकला होता. ही वेब सीरीज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती.

Visit : Policenama.com