इंस्टाग्राम मधून ‘लीक’ झाला ४.९ कोटी युजर्सचा ‘डेटा’ ; सेलिब्रिटींचाही समावेश

मुंबई : वृत्तसंस्था – फोटोसाठी प्रसिद्ध असलेले माध्यम म्हणून इन्स्टाग्रामची ओळख आहे. अनेक सेलिब्रिटी लोक फेसबुकपेक्षाही इन्स्टाग्रामला जास्त पसंती देतात मात्र इन्स्टाग्रामच्या युझर्ससाठी एक धक्कादायक माहिती समोर येतेय.

लाखो सेलिब्रेटी आणि प्रभावशाली व्यक्तींचा वैयक्तीक डेटा इन्स्टाग्रामद्वारे लीक झाला आहे. मुंबई येथील सोशल मीडिया मार्केटिंग फर्म चटर बॉक्सने या डेटाबेसला ट्रेस केले आहे.

या अहवालानुसार ज्या लोकांचा डेटा लीक झाला आहे त्यामध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या, त्यांची वैयक्तीक माहिती, सार्वजनिक माहिती, प्रोफाईल पिक्चर, लोकेशन, वैयक्तीक संपर्कांची यादी या स्वरुपाचा डेटा लीक झाला आहे. जेव्हा चटर बॉक्स फर्मने हे कृत्य केल्याचा अहवाल टेक क्रंचने दिल्या बरोबर चटर बॉक्सने आपल्या डेटाबेसला ऑफलाईन केले.

सर्वात प्रथम सिक्युरिटी रिसर्चर अनुराग सेन यांना याबाबत माहिती मिळाली. सेन यांनी माहिती मिळताच याबाबत टेकक्रंचला याबाबत सावधान केले होते. युजर्सचा डेटा लीक करणाऱ्या चटर बॉक्स ही फर्म आपल्या अकाउंटवर पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींना पैसे देते. हा डेटा लीक झाल्यानंतर इन्स्टाग्रामचे मालकी असणाऱ्या फेसबुकने आपण या घटनेची चौकशी करत आहोत असे सांगितले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like