Minister Nitin Raut | पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

सांगली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मागील आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पूर आला. यामुळे अनेक घरांचे नुकसान देखील भरपूर प्रमाणात झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात जलप्रलय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर होते. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) देखील सांगलीतील (Sangli) पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले होते. यावरी राऊत यांनी एक मोठी घोषणा केलीय. पूरग्रस्त भागातील वीज बिल (Electricity bill) वसुलीला स्थगिती (Postponement) देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिले आहेत.

आज शुक्रवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) सांगलीतील (Sangli) पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले होते.
पूरग्रस्त भागात वीज बिल वसूल करू नका, परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिले भरणेसाठी सवलत दिली जाईल.
याच बरोबर वीज बिल माफी बाबत त्यांनी म्हटलं आहे की,
वीज बिल माफीचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करणार असल्याचं देखील ऊर्जामंत्री यांनी म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) झालेल्या लोकांचे
मोठे नुकसान झाले आहे.
होतं नव्हतं ते सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेलं.
म्हणून आधीच संकटात सापडलेल्या लोकांना आणखी वीज बिल भरण्याचा डोक्याला ताप नको म्हणून ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज बिल वसुलीला स्थगिती दिलीय.

 

दरम्यान, त्यावेळी बोलताना ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, अधिक मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुका, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला आहे.
अशा परिस्थितीत या महापुरात महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे.
या पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश देखील
त्यावेळी ही ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिलेत.

 

Web Title : Minister Nitin Raut | maharashtra flood energy minister nitin raut stay on collection of electricity bill in flood hit area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Skin Care Tips | ‘या’ घरगुती उपायांमुळं काही मिनीटांमध्येच हात-पायाचं टॅनिंग होईल दूर, चमकेल तुमची त्वचा, जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’

Modi Government | ‘पूर’, ‘भूकंप’, ‘आग’ लागल्यापासून घराला सुरक्षा ‘कवच’ देईल मोदी सरकार ! आणणार ‘ही’ सर्वात मोठी स्कीम, जाणून घ्या