राज्यमंत्री बच्चू कडू तिसऱ्यांदा विलगीकरणात

अमरावती : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आहे तर काही निर्बंध कडक करण्यात आले आहे. दरम्यान रात्रीची संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होत असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पुन्हा एकदा विलगीकरणात राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. यापूर्वी बच्चू कडू यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे.

ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना बच्चू कडू म्हणाले की मला न विचारता पुढील तीन दिवस कोणीही भेटायला येऊ नये. तसेच, ताप व अंगदुखी असल्याने अँटिजेन टेस्ट केली असून ती निगेटिव्ह आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्याने पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असेहि ते म्हणाले.

 

 

 

फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह
१९ फेब्रुवारी बच्चू कडू यांनी ट्विट करत दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. सध्या मी आयसोलेशनमध्ये असून माझ्या सम्पर्कात आलेल्यांनी सर्वानी स्वतःची काळजी घ्यावी. असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यानंतर अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, १९ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

१५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून १५ एप्रिलपर्यंत काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आजपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे ती मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल. विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड पडेल. जमावबंदीच्या काळात उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्‍स, सर्व सिनेमागृहे, रेस्‍टॉरंट बंद राहणार आहेत.