सुरेश कलमाडी रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांना रविवारी दुपारी रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चक्‍कर आल्याने पडल्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असुन आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कलमाडी यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजताच त्यांच्या असंख्य समर्थकांनी रूबी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे.

गेल्या दोन-चार वर्षापासुन पुण्यातील सक्रिय राजकारणापासून दूर फेकल्या गेलेले कलमाडी अलिकडील काळात काहीसे सक्रिय होवु पहात आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचेही अलिकडील काळात सांगण्यात आले होते. कलमाडी यांच्या मेंदुमध्ये रक्‍ताची गाठ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. न्यूरोलॉजी विभागातून त्यांना 6 व्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले आहे. त्यांची आता प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना चक्‍कर आल्याने ते खाली पडले आणि त्यांना उपचारासाठी तात्काळ रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक : सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा कस पणाला लागणार