EPF खातेधारकांना 8.65 % व्याज, नोटिफिकेशन जारी

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – नोकरदार वर्गासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, भविष्य निर्वाह निधी खात्यावर (ईपीएफ) मिळणाऱ्या व्याजासंबंधित नोटिफिकेशन जारी झाले आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी वित्त वर्ष 2018-19 च्या पीएफ वर 8.65 टक्के व्याज मिळेल हे यापुर्वीच सांगितले होते. याचा थेट फायदा 6 कोटी खातेधारकांना मिळणार आहे.

ईपीएफ खातेधारकांना 8.65 टक्के व्याज
ईपीएफ व्याजदराबाबत बऱ्याच कालावधीपासून वित्त मंत्रालय आणि श्रम मंत्रालयात सहमती नव्हती. अखेर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, ईपीएफ खातेधारकांना 8.65 टक्के व्याज मिळेल. आज यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

Visit : policenama.com