Minor Girl Molestation Case | पुणे : ‘माणसाला फिलींग असतात’ म्हणत 16 वर्षाच्या मुलीसोबत असभ्य वर्तन, शाळेतील कर्मचाऱ्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Minor Girl Molestation Case | सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जेवणाचा डबा आणण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला (Minor Girl Molestation Case). याप्रकरणी शाळेत मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सदाशिव पेठेत (Sadashiv Peth Pune) सोमवारी (दि.29) दुपारी बारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मंगेश गायकवाड (रा. सेवानंद सोसायटी, बॅरीस्टर गाडगीळ रस्ता, सदाशिव पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ) सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड (PSI Swati Bhrad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षाची मुलगी सदाशिव पेठेतील एका नामांकित शाळेत शिकते. तर आरोपी या शाळेत मदनीस म्हणून कामाला आहे. फिर्यादी यांच्या मुलीला शाळेतील साहित्य खरेदी करायचे होते. आरोपीने पीडित मुलीला साहित्य खरेदी करुन देण्यासाठी रविवार पेठेत (Raviwar Peth Pune) घेऊन गेला. तेथून शाळेत परत येत असताना आरोपीने मुलीला घरुन जेवणाचा डबा घेऊन जाऊ असा बहाणा करुन तिला घरी घेऊन गेला.

घरी गेल्यानंतर आरोपी मंगेश याने मुलीसोबत जवळीक साधण्यासाठी तिचा हात पकडला.
त्यावेळी मुलीने तुमचे लग्न झाले आहे असे म्हटले असता ‘बायको असली म्हणून काय झाले, माणसाला फिलींग असतात’
असे बोलून मुलीसोबत असभ्य वर्तन केले. पीडित मुलीने घरी आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.
त्यानंतर मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय स्वाती भराड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार