कुपवाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कुपवाड : पोलीसनामा आॅनलाइन – शहरातील एका अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ही घटना घडली. दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी एका पोलिसाने हालचाली केल्या आहेत, त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. अमिन शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी पिडीत अल्पवयीन मलगी आपल्या एका नातेवाईकाच्या घरी रेशनवरील तांदूळ आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला मुलगी घरी परत आली नाही. म्हणून घरातील नातेवाईकांनी तिचा शोधाशोध घेण्यास सुरूवात केली. बराच उशिराने पिडीत मुलगी घरी आली. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली.

संतापजनक… शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, विद्यार्थीनीला गेले दिवस 

रविवारी दुपारी पिडीत मुलीने शनिवारी घडलेला सर्व प्रकार घरातील नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे नातेवाईकांनी संशयित अमिन शेख यांच्याविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रमेश कसबेकर तपास करींत आहेत.

तरुणीस डांबून ठेवून पोलीस पुत्राने केला बलात्कार  

मिरवणारा रडारवर
एका पोलिसाने हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याची चर्चा आहे. बातमी फुटू नये म्हणून त्याने खूप मेहनत घेतली. पण या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि गुन्हाही दाखल झाला. पण त्या मिटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याची चौकशी होणे गरजेचे आहे.