दोन्ही मुलीच, मंदिरात जाऊन केलं लग्न संसार सुरु करणार; पण…

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या धनबाद येथे दोन अल्वपयीन मैत्रिणींनी मंदिरात जाऊन लग्न केले आणि कुटुंबापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. पण कुटुंबियांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या लग्नाला विरोध केला. एक मुलगी 14 वर्ष आणि दुसरी 13 वर्षांची आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोघींना सज्ञान होईपर्यंत कुटुंबाकडे सोपविले आहे.

लग्न केलेले हे एक लेस्बियन कपल असून, या दोन्ही अल्पवयीन मुली धनबादच्या सरायढेला ठाण्यातील रहिवासी आहेत. यामध्ये 14 वर्षांची मुलगी मुलांसारखी हेअर स्टाईल आणि कपडे घालते. बिंधासपणे प्रश्नांची उत्तर देते. तर दुसरी 13 वर्षांची मुलगी मुलींसारखी सौम्य आणि सरळ आहे. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी सौम्यतेने देते.

पती बनलेल्या मुलीने सांगितले, की आम्ही दोघी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही दोघीही एकमेकांशिवाय जिवंत राहू शकत नाहीत, असे त्या म्हणतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तिने घरातून पळून जाऊन एका मंदिरात लग्न केले आणि जवळच्याच एक झोपडीत राहू लागले. तेव्हा त्या दोघींनी आपल्या एका मित्राची मदत घ्यायचे ठरवले. पण हे प्रकरण लक्षात आल्याने त्याने मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर दोघी आपापल्या घरी परतल्या.

मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र
13 वर्षीय मुलीच्या आईने मुलीच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र पाहिले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली. या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

सज्ञान झाल्यावर पत्नीला आणणार
पती बनलेल्या मुलीने सांगितले, की ‘आम्ही दोघीही सध्या अल्पवयीन आहोत. जेव्हा आम्ही सज्ञान होऊ तेव्हा पत्नीला तिच्या घरातून आणून माझ्यासोबतच ठेवेन. मी तिच्यावर इतके प्रेम करेन की पुन्हा पोलिस ठाण्याचे तोंडही पाहायला लागणार नाही’.