शाहिद कपूरची पत्नी मीरा आपल्या मुलांना आजी-आजोबांकडे सोडून करते ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आपल्या परिवाराला सध्या वेळ देत आहे. शाहिदची पत्नी मीरा नेहमी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर आपल्या दोन मुलांचा, शाहिद आणि तिचा फोटो शेअर करत असते.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपुत आपल्या परिवाराला खूप महत्व देते. मीराने आता आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलांच्या फोटोऐवजी एक खास पोस्ट शेअर केली आहे. मीराने लिहले की, जेव्हा दोन्ही मुले आपल्या आजी-आजोबांच्या घरी जातात तेव्हा ती आपली झोप पुर्ण करत असते. मीशा आणि जैनला वेळ दिल्या कारणाने तिला आराम मिळत नाही. त्यामुळे जेव्हा मुले आपल्या आजी-आजोबाच्या घरी जातात तेव्हा ती आराम करते.

मीरा आपल्या मुलांच्या खूप जवळ आहे. मीरा नेहमी आपल्या दोन मुलांसोबत दिसून येते. मीरा आपल्या मुलीला स्कूलमध्ये सोडवायला आणि घ्यायला सुद्धा जाते. एवढेच नव्हे तर मीरा आपल्या दोन मुलांसोबत टाइम स्पेंड करते. त्याच्यासोबत खेळत असते. आपल्या दोन लहान मुलांसोबत तू खूप प्रेमाने वागते. शाहिद सुद्धा आपल्या बिजी शेड्यूलमधून वेळ काढून मुलांना वेळ देत असतो.

image.png

२०१५ मध्ये शाहिदने मीरासोबत लग्न केले. लग्नाच्या १ वर्षानंतर तीने २०१६ मध्ये मीशाला जन्म दिला. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जैन आहे. त्याचा जन्म २०१८ मध्ये झाला. शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर त्याचा ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या यशानंतर त्याला अनेक मोठ्या चित्रपटाच्या ऑफर येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त