Mirzapur Controversy : ‘मिर्झापूर’वरील ‘त्या’ वादामुळं SC नं अ‍ॅमेझॉन प्राईम, डायरेक्टर आणि केंद्र सरकारला पाठवली नोटीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अ‍ॅमेझॉन प्राईम वरील वेब सीरिज मिर्झापूर विरोधात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेत सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली आहे. कोर्टाकडू ओटीटी प्लॅटॉफर्म अ‍ॅमेझॉन प्राईम, केंद्र सरकार आणि फिल्म डायरेक्टर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या याचिकेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारा कंटेट रेग्युलेट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिर्झापूरमधील एका रहिवाशानं ही याचिका दाखल केली आहे. यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारा कंटेट रेग्युलेट करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्ते एस के कुमार यांनी आपल्या अर्जात लिहिलं की, वेब सीरिजमध्ये मिर्झापूर शहर आतंकवादी आणि बेकायदेशीर हालचालींनी युक्त असं शहर दाखवण्यात आलं आहे. ज्यानं प्रतिमा खराब करण्याचं काम केलं आहे. मुख्य न्यायाधीश जस्टीस एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या प्रकरणी नोटीस जारी केली आहे.

याआधी युपीच्या मिर्झापूरमध्ये या सीरिज विरोधात केस दाखल करण्यात आली होती.

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सीजनमध्ये अनेक पात्र असे होते ज्यांनी खूप अटेंशन घेतलं.