मिर्जापूरच्या मौलानांचे निर्णय ! लग्नामध्ये DJ वाजवल्यास निकाहनामा वाचला जाणार नाही

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर येथील मरकजी सुन्नी जमियत उलेमा-ए-हिंदने मदरसा अरबिया अर्थातच मदरश्यांनी घेतलेल्या बैठकीदरम्यान एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर मुस्लिमांच्या लग्नात डीजे (DJ) वाजवला जाऊ नये, जिथे लग्नामध्ये डीजे वाजवले जातील किंबहुना विवाह (निकाह) ठरवण्याच्यावेळी जर डिजे असले तर काझी निकाहनामा वाचू शकणार नाहीत असे या निर्णयात म्हटलं आहे. तसेच, तिथे डीजेदरम्यान काझीने निकाहनामा वाचला तर काझीला समाजबहिष्कृत करण्यात येणार आहे. मदरसिया अरबिया येथे झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाशी संबंधित अनेक धर्मगुरु सहभागी झाले होते.

तसेच, हुंडा मागणे, कार्यक्रमामध्ये उभं राहून जेवणं, डीजे वाजवणं तसेच विवाहामध्ये फटक्यांची आतिशबाजी करणाऱ्यांविरोधात विवाह लावणाऱ्या धर्मगुरुंनीच मोहीम सुरु केली असून याची सुरुवात मिर्झापूरपासून केली जात असल्याची माहिती मरकजी सुन्नी जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना नजम अली खान यांनी दिली. असे काही नियम मौलाना नजम अली खान यांनी मुस्लीम समाजातील विवाहाबाबत ठरवले आहे. तसेच, मुस्लीम समाजामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी लग्नामध्ये होऊ लागल्या आहेत, या मुद्द्यावर बैठकीमध्ये गहण चर्चा करण्यात आली. मुस्लीम लग्नांमध्ये डीजे वाजवणे, फटाके फोडणे, वायफळ खर्च करणे, हुंडा घेणे यासारख्या गोष्टी वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शरीयतच्या नियमांनुसार या सर्व गोष्टी हराम आहेत. त्यामुळेच या बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीने अशा गोष्टी करणाऱ्या मुस्लिमांची लग्न लावून देण्यात येऊ नयेत असा निर्णय घेतला आहे.

आधी लोकांना शरीयतच्या नियमांनुसार विवाह (निकाह) करण्याबाबत सांगण्यात येईल. मात्र त्यानंतरही त्यांनी नकार दिल्यास कोणतेच काझी निकाहनामा वाचणार नाहीत. जर एखाद्या ठिकाणी काझींना या व्यवस्थांसाठी सोय केल्याचं दिसलं तर ते निकाह न लावताच तिथू निघून जातील असं म्हटलं आहे. जर एखाद्या काझीने नियमांचे उल्लंघन करुन निकाह लावून दिला तर त्याला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करण्यात येईल. शरीयत नियमांचे पालन केलं जावं आणि वायफळ खर्च कमी करण्यात यावा यामुळे हा निर्णय घेतला आहे. असे कमिटीद्वारे मौलानांनी सांगितले आहे.