मुलाचे लक्ष शिक्षण आणि करिअरवर केंद्रित करण्यासाठी, लहान वयापासूनच शिकवा घरगुती ‘ही’ कामे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकालच्या बदलत्या जीवशैलीचा परिणाम लहान मुलावर अधिक होत आहे. नवनवीन गॅझेट्स, टीव्ही , मोबाईलमुळे मुलांमध्ये आळशीपणा वाढत चालला आहे. यासर्वांत त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, ज्यामुळे पालक सर्वाधिक त्रस्त आहेत. जर पालकांची इच्छा आहे कि, मुलाचे लक्ष अभ्यास आणि करिअरवर असावे तर लहान वयपासूनच त्यांना स्वत: चे काम स्वतः करण्याची सवय लावा. त्यांना घरातील छोटी- मोठी कामे सांगा. ज्यामुळे त्यांच्यात एक चांगले आणि जबाबदार व्यक्तिमत्व विकसित होईल.

सकाळी स्वतः उठण्याची सवय :
लहानपणापासूनच मुलांची रोजची दिनचर्या अशी ठेवा की त्यांना लवकर झोपण्याची आणि सकाळी योग्य वेळी उठण्याची सवय लागेल. ही सवय आयुष्यभर कामी पडेल. महाविद्यालय असो किंवा व्यावसायिक जीवनात वेळेवर पोहोचण्यात त्याला कोणतीही अडचण येणार नाही.

किचनची कामे
स्वयंपाक घरातील छोटी – छोटी कामे जसे कि ब्रेडवर बटर -जाम लावणे, साधे सँडविच बनवणे, आपला टिफिन साफ करणे, पाण्याच्या बाटल्या भरणे इत्यादी 8-9 वर्षाच्या लहान मुलांना शिकवा. यामुळे आवश्यकत पडल्यास स्वत: साठी जेवणाची व्यवस्था करण्यास ते सक्षम असतील.

कपडे धुणे
वयाच्या 8 व्या वर्षापासून मुलांना स्वतःचे कपडे धुण्यास शिकवा. याची सुरुवात रुमालाने करा. यासाठी कपडे धुताना त्यांना आपल्या जवळ बसवा आणि कपड्यांना साबण लावणे आणि पाण्यातून काढणे शिकवा. रूमला धुण्यास शिकविल्यास अंडरगारमेंट्स धुण्यास शिकवा. मग त्यांना वॉशिंग मशीनबद्दल सांगा.

स्वतःच्या गोष्टी सांभाळणे
आई मुलांच्या जीवनावश्यक वस्तू तिच्या कपाटांमध्ये ठेवते किंवा त्यांच्या वॉर्डरोबची व्यवस्था स्वतः करते. सुरुवातीच्या काही वर्षांत हे करणे आवश्यक आहे, परंतु वयाच्या आठ-नऊ वर्षापासूनच त्यांना स्वतःच्या गोष्टी सांभाळण्यास शिकवले पाहिजे. यासाठी त्यांना एक वेगळे कपाट द्या आणि त्यांचे कपडे, चप्पल, सामान इत्यादी स्वतंत्रपणे ठेवायला शिकवा.

स्वतःचे प्रश्न सोडविण्यास शिकवा
मुले नेहमी शेजारच्या मुलांशी भांडण झाल्यावर पालकांशी मध्यस्थी साठी बोलावतात. अश्या वेळी पालकांनी त्यामध्ये पडण्याऐवजी मुलांना त्यांचे प्रश्न स्वतः सोडविण्याची सवय लावा. इतकेच नाही, वर्गमित्रांशी मतभेद असले तरीही शिक्षकांसमोर आपली बाजू मांडण्याचा सल्ला द्या. दररोज छोट्या छोट्या गोष्टी स्वतः सोडविल्याने ते आपली लढाई स्वतः लढणे शिकतील.