धक्कादायक ! आई आहे म्हणून ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून ‘या’ सौंदर्यवतीला काढलं बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका सौंदर्यवतीला मिस वर्ल्ड स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आहे. याचं कारण समजलं तर तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. सदर सौंदर्यवती ही एका मुलाची आई असल्यानं तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आहे. माजी मिस युक्रेन असलेल्या या सौंदर्यवतीनं मिस वर्ल्ड स्पर्धेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वेरोनिका डिडुसेंको असं तिचं नाव आहे. वरोनिकानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. वेरोनिकानं भली पोस्ट लिहिली आहे. पोस्ट शेअर करताना तिनं वकिल रवी नायक आणि मुलासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

आपल्या इंस्टा पोस्टमध्ये वेरोनिका म्हणते, “माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगाही आहे. म्हणून मिस युक्रेनचा किताब जिंकल्यानंतरही मला मिस वर्ल्ड स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आलं. मला कितबा परत नको आहे परंतु स्पर्धेचे नियम बदलणं गरजेचं आहे. यामुळे इतर महिलांनाही फायदा होईल. कारण अशा नियमांमुळे महिलांमध्ये भेदभाव स्पष्ट दिसून येत आहे.”

24 वर्षांच्या वेरोनिकानं गेल्या वर्षी मिस युक्रेनचा किताब जिंकला होता. जेव्हा ती आई आहे हे मॅनेजमेंटच्या लक्षात आलं तेव्हा अवघ्या 4 दिवसांतच तिचा किताब परत घेण्यात आला. नियमांनुसार, विवाहित महिला किंवा मुलं असणाऱ्या महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकत नाहीत.

परंतु स्पर्धेचे नियम तिला ठाऊक होते आणि त्याची तिला कल्पना होती असंही वेरोनिकानं म्हटलं आहे. परंतु तिचं म्हणणं आहे की, तिचा मुलगा करिअरच्या मघ्ये कधीच येणार नाही. स्पर्धेचा हा नियम अघोरी असल्याचं सांगत #righttobeamother या हॅशटॅग आणि कॅप्शनच्या अंडर ती जनजागृती आणण्याचं काम करत असल्याचं तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/Bzz7wkwoOuG/