home page top 1

#Video : ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ची छेडछाड आणि मारहाण, जाणून घ्या प्रकरण

कोलकाता : वृत्तसंस्था – देशात कोणतीही मुलगी कुठे सुरक्षित आहे का, असा प्रश्न आहे. कारण रोज महिलांबाबत अनेक घटना घडत आहेत. मिस इंडिया यूनिवर्स उशोशी सेनगुप्ता रात्रीच्या वेळी कामावरुन परतत असताना काही तरुणांनी तिची छेड काढल्याची आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर उशोशीने फेसबूकवर पोस्ट लिहित. या सर्व प्रकाराला वाचा फोडली. या पोस्टनंतर तात्काळ कोलकाता पोलीसांनी सक्रिय होत आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आम्ही घरी जात असताना ३ बाईकवर ६ मुलांनी आमचा पाठलाग केला. तसेच आमच्यासोबत छेडछाड आणि मारहाण केली. मला गाडी बाहेर ओढले आणि मी या प्रकाराचा काढलेला व्हिडीओ डिलिट करण्यासाठी माझा फोन तोडण्याचा प्रयत्न केला. मी ओरडल्यानंतर आजूबाजूचे लोक तेथे आले, असं उशोशीने फेसबूक पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

तसंच, तेथे एक पोलीस अधिकारी दिसला. मी त्याच्याकडे पळतपळत जाऊन मारहाण करणाऱ्या तरुणांना रोखण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने हा भाग माझ्या अंतर्गत येत नसून भागलपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो, असे सांगितले. वारंवार विनंती केल्यानंतर अखेर पोलीस आले आणि त्यांनी संबंधित तरुणांना पकडले. मात्र, ते तरुण पोलिसांना धक्का देऊन पळून गेले, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. आम्ही हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

Last night 18th June 2019 at around 11:40 pm I took an uber from JW Marriott kolkata to go back home after finishing…

Geplaatst door Ushoshi Sengupta op Dinsdag 18 juni 2019

 

आरोग्यविषयक वृत्त

‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन 

 दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी 

पावसाळ्यात “ऍलर्जीचा” सामना करताना 

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे 

 पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम

 जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक 

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त 

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय 

Loading...
You might also like