बेपत्ता बँक अधिकाऱ्याची रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कमला मिलमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेचे प्रशासकीय अधिकारी बुधवारी अचानक बेपत्ता झाले. आता त्यांची कार नवी मुंबईत सापडली असून तिच्यावर रक्ताचे डाग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0d97a28-b329-11e8-be25-b32a18def326′]

मलबार हिल परिसरात सिद्धार्थ संघवी (वय ३७) हे पत्नी, ९ वर्षांचा मुलगा आणि आईवडिलांसह राहतात. ते लोअर परळच्या कमला मिलमधील एचडीएफसी बँकेच्या शाखेत प्रशासकीय अधिकारी आहेत. सकाळी १० ते रात्री ८ ही त्यांची कामाची वेळ आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कारने ते कामाला आले. कामकाज उरकून सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान ते निघाले. या वेळी तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना कारमधून बाहेर जाताना पाहिले होते. तेथूनच पुढे ते नॉट रिचेबल झाले.

रात्री उशीर झाला म्हणून कुटुंबीयांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे चौकशी केली. रात्रभर वाट पाहिली. मात्र, काहीच पत्ता न लागल्याने गुरुवारी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, शुक्रवारी त्यांची कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताने माखलेली आढळली. पोलिसांचे एक पथक नवी मुंबईला रवाना झाले. त्यांनी कार ताब्यात घेत, रात्री उशिरा ती मुंबईत आणली. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाताच तपास सुरू केला. शुक्रवारी सकाळपासून हे अधिकारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. गुन्हे शाखा कक्ष ३ ही या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत.

संघवी यांचा मोबाइल सीडीआर काढण्यात येत आहे. त्यांच्या शेवटच्या लोकेशनवरून तपास सुरू आहे. काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

राहुल गांधी मानसरोसर यात्रेत ३४ किमी पायी चालले

संघवी यांचे वार्षिक उत्पन्न ४५ ते ५० लाख होते. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे आर्थिक वाद आहे का? या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे. त्यांच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.