‘मिशन मंगल’ बनला ‘मिशन माखन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री तापसी पन्नूचा अभिनय असलेल्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटाला भरभरून यश मिळाले आहे. यासाठी दुग्ध कंपनी अमूल इंडियाने त्याचे विशेष कौतुक केले आहे. जन्माष्टमीनिमित्त अमूल इंडियाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला ‘मिशन माखन’ असे नाव देण्यात आले आहे. अमूल ब्रँड नेहमीच चर्चित घटना किंवा व्यक्ती यांविषयी एका खास अंदाजात भाष्य करत असतो.

अमूलने तयार केलेल्या या फोटोच्या कॅप्शनवर लिहिले आहे, “अमूल टॉपिकल: मिशन मंगळ मोहिमेस हातभार लावणाऱ्या वैज्ञानिकांवर बॉलीवूड हिट. अमूलने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक पुरुष आणि स्त्री ब्रेड आणि बटर खाताना दिसत आहे. चित्रात एक रॉकेटही आहे आणि त्यात ‘अमूल मार्स अपील’ तसेच मिशन माखन हे मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे.

हा फोटो ट्विट करत तापसीने लिहिले की, “किती मजा आहे ! हे नेहमीच खूप खास असते ! धन्यवाद अमूल ! पुढच्या वेळी मी हेअर बँड माझ्या लूकमध्ये जोडेल.

व्यापार तज्ज्ञ तरण आदर्श यांच्या माहितीनुसार ‘मिशन मंगल’ने भारतात आतापर्यंत 128.16 कोटींचा व्यवसाय केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like