मनसेच्या ‘आक्रमक’ पवित्र्यापुढे अक्षयकुमारची ‘माघार’ , ‘मिशन मंगल’ मराठीत ‘डब’ होणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रदर्शनापूर्वीच गाजत असलेला अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणारा मिशन मंगल हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डब करून मराठीत आणण्याची घोषणा काल शुक्रवारी केली गेली. अशी घोषणा होताच महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करून या चित्रपटाला विरोध केला. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून फक्त दोन तासात मिशन मंगल चित्रपट मराठी आणण्याची घोषणा मागे घेण्यात आली.

अमेय खोपकर यांनी लिहिले की, ‘मिशन मंगल’ हा हिंदी चित्रपट मराठीमध्येही डब करुन प्रदर्शित होत आहे. अशाप्रकारे हिंदी सिनेमे मराठीत डब करुन प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा तीव्र विरोध होता आणि यापुढेही राहील. मूळ ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटास किंवा तो प्रदर्शित होण्यास आमचा कोणताही विरोध नाही. पण तो मराठीत प्रदर्शित करण्यास आक्षेप आहे. मराठी चित्रपटांना योग्य प्रमाणात शोज मिळत नाहीत. या मुद्द्यावरुन मनसेचं आंदोलन गेली अनेक वर्षं सुरु आहे. हिंदी सिनेमे जर मराठीत डब झाले तर मूळ मराठी चित्रपटांना शोज मिळण्यात आणखी अडचणी येतील आणि याच कारणामुळे आम्ही विरोध करत आहोत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158766980530550&id=662630549

इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी काय करायचं असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158766842355550&id=662630549

आरोग्यविषयक वृत्त