Photos : मितालीच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी ! लक्ष वेधून घेताहेत ‘हे’ खास फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हे गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या बातम्यांमुळं चर्चेत आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लवकरच दोघं विवाहबद्ध होणार आहेत. नुकताच त्यांचा हळद समारंभ झाला होता. यानंतर आत त्यांचा मेहंदीचा सोहळा शुक्रवारी (दि 22 जानेवारी) पार पडला.

मिताली आणि सिद्धार्थ यांच्या मेहंदीच्या सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. यानंतर मितालीच्या लुकची खूप चर्चा होताना दिसत आहे. तिच्या हातावर मेहंदी काढतानाचा फोटोही चाहत्यांना खूप आवडला आहे.

या फोटोची खास बात अशी आहे की, या फोटोत सिद्धार्थ मितालीच्या हातावर मेहंदी काढत आहे. या फोटो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी याला पसंती दाखवली आहे.

सिद्धार्थ आणि मिताली दोघांनीही या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहते कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहेत. काहींनी हे फोटो सोशलवर शेअरही केले आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून पुण्याला गेले आहेत. यानंतर त्यांचे काही विधी पार पडले. ज्याचे फोटो सिद्धार्थ आणि मितालीनं सोशलवर शेअर केले होते.