MLA Bacchu Kadu | ‘शरद पवारच भाजपचा गेम करतील’, आमदार बच्चू कडूंचं सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली. मात्र, नुकतीच त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याने शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी शरद पवार यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे. तसेच मंत्रीपदाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शरद पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सध्याच्या राजकीय संभ्रमावस्थेवर भाष्य केलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनी मुंबईमधील वांद्र्याच्या ताज लँड एन्ड (Taj Land End Bandra) या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटातील (Shinde Group) कॅबिनेट मंत्र्यांसाठी (Cabinet Minister) स्नेहभोजन आयोजन केलंय. या स्नेहभोजनाला निमंत्रण का आलं नाही? यावरही त्यांनी भूमिका मांडली.

मी कॅबिनेट मंत्री नाही म्हणून…

मला निमंत्रण आलेलं नाही. पण त्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच बोलावलं आहे. मी कॅबिनेट मंत्री नसल्यामुळे बोलवलं नसेल. मंत्र्याचा दर्जा असणं आणि कॅबिनेट मंत्री असणं यात फरक आहे. सरकारमध्ये कुणी हलक्या डोक्याचा नाहीये. सगळे मजबूत विचारांचे लोक आहेत. त्यामुळे मी मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केल्यामुळे कुणी नाराज होऊन मला डिनरला बोलवलं नसेल, असं वाटत नाही. मीही काही ती बाब मनाला लावून घेत नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रीपद नको

उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) फारकत घेऊन एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणारे बच्चू कडू मंत्रिपदाची वाट पाहून थकून गेले आहेत. आधी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल व मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लांबल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या बच्चू कडूंनी आता मंत्रीपदाला स्पष्ट नकार दिला आहे. मंत्री होण्याची आता वेळ नाहीये. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी आता मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. तशी वेळ आलीच तर माझे सहकारी आमदार राजकुमार बडोले (MLA Rajkumar Badole) यांना मी मंत्री करेन, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा मला कालच फोन आला होता. काय बोलणं झालं तो विषय जाहीरपणे न सांगता येण्यासारखा आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

शरद पवार भाजपचा गेम करतील

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ही भेट आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.
शरद पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, समुद्राची खोली मोजता येईल, पण शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे,
ते मोजणं शक्य नाही. असं होऊ शकतं की भाजपानं (BJP) पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल.
पण उलटंही होऊ शकतं. शरद पवारही भाजपचा गेम करतील की काय अशी संभ्रमावस्था आहे,
असं सूचक विधान बच्चू कडू यांनी यावेळी केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | राज ठाकरेंनी भाजपचा प्रवास समजून घ्यावा, आम्ही कधीही…, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार