MLA Chetan Tupe | ‘शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम व्हावेत’ – आमदार चेतन तुपे

आयुष्यमान योजना शिबिराचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – MLA Chetan Tupe | केंद्र सरकार व राज्य शासनाच्या माध्यमातून गरीब व सर्व घटकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजनांचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी केले. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी आयुष्यमान भारत योजनेच्या शिबिराचे उद्धघाटन 15 नंबर येथे आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

 

माजी आमदार महादेव बाबर (Former MLA Mahadev Babar), नगरसेवक मारुती आबा तुपे, आनंद अलकुंटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, पुरंदर प्रमुख शंकर नाना हरपळे, विजय मोरे, राष्ट्रवादी हडपसर अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, जीवन जाधव, राजाभाऊ होले, अभिजित कदम, प्रकाश शेवाळे, रमेश निवंगुणे, योगेश ढोरे, सूर्यकांत गिरी गोसावी, बाळासाहेब लोळे, नंदू आजोतिकर, राष्ट्रवादी महिला सरचिटणीस वंदना मोडक, मनीषा राऊत, डॉ.जितेंद्र देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

सहाव्यांदा आर्यनमॅन झालेले उद्योजक दशरथ जाधव, प्रथम आर्यनमॅन डॉ.राहुल झांजुर्णे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिबिराचे आयोजन गजानन मित्र मंडळ, स्वाभिमानी महिला संस्था, श्री. गणेश मित्र मंडळ,
निराकार आध्यात्मिक मिशनच्या वतीने पल्लवी प्रशांत सुरसे, सुवर्णा सतीश जगताप,
सविता अनिल मोरे यांनी केले होते. प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला.

 

Web Title : MLA Chetan Tupe | ‘Government schemes should be initiatives to reach out to the common man’ – MLA Chetan Tupe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update