MLA Devendra Bhuyar | तहसीलदारांना शिवीगाळ करणार्‍या आमदारास 3 महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना आज न्यायालयाने एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना तीन महिन्याचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयाने (Amravati District Court) हा महत्वाचा निकाल दिला आहे. 2013 साली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तहसीलदार राम लंके (Tehsildar Ram Lanke) यांना जीवे मारण्याची धमकी देऊन माईक अंगावर फेकला होता. या प्रकरणी तब्बल 7 वर्षांनंतर निकाल दिला गेला आहे.

2013 साली पंचायत समिती सदस्य असतांना देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयात गेले होते. यामध्ये शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का होते तुम्ही माझा फोन कट का केला? असा दम देत, आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी तहसीलदार राम लंके (Tehsildar Ram Lanke) यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार राम लंके (Tehsildar Ram Lanke) यांनी तक्रार दाखल केली होती.
यावरून कलम 353, 186, 294, 506 अंतर्गत पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला होता.
यामध्ये दोषापत्र दाखल करण्यात आल्याने आणि यात गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती अतिरिक्त सत्र न्यायालयाने याबाबत निकाल दिला.
यावरून तीन महिने सक्त मजूरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हे देखील वाचा

Coronavirus | कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Crime | विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, अभियंत्यावर FIR

Afghanistan Crisis | ’आम्ही हळु-हळु मरून जाऊ…’ अफगाणमध्ये बिघडलेल्या स्थितीवर आश्रूंना वाट करून देणार्‍या मुलीचा हृदयद्रावक व्हिडिओ वायरल

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MLA Devendra Bhuyar | amravati morshi mla devendra bhuyar sentenced 3 months jail for abusing tehsildar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update