MLA Geeta Jain | अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या अभियंत्याला आमदार गिता जैन यांनी लगावली कानाखाली, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) करणाऱ्यांवर जरब बसावी यासाठी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, मीरा भाईंदरमध्ये याचसंदर्भात एक वेगळं दृश्य पाहायला मिळाले. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यांना दमदाटी केल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. गीता जैन (MLA Geeta Jain) यांनी अभियंत्यांना दमदाटी करत एकाच्या कानाखाली (Slapped Engineer) लगावली. हा प्रकार मंगळवारी (दि.20) दुपारी साडेचारच्या सुमारास प्रभाग 6 येथे काशिमीरातील पेणकर पाडा येथे घडला.

 

आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या (Mira Bhayander Municipal Corporation) ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील (Junior Engineer Shubham Patil) यांची कॉलर धरुन कानशीलात लगावली. पेडणकर पाडा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर तोडक कारवाईसाठी या अभियंत्यांच्या नेतृत्वात पथक गेलं होतं. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे. तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत जैन यांनी संबंधित अधिकऱ्यांची कानउघडणी केली.

यावेळी, आमदार यांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने गीता जैन यांना राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली. दरम्यान, पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत असे शासनाचे आदेश आहेत, असेही गीता जैन यांनी सांगितले.

 

 

Web Title :  MLA Geeta Jain | first the ear opening then slapped officer mla geeta jain
angry with officer of municiple corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations