MLA Madhuri Mishal | सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार – आमदार माधुरी मिसाळ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Mishal) यांनी अधिकाऱ्यांसोबत सिंहगड रस्त्याच्या (Sinhagad Road) पर्यायी रस्त्याची (Alternate Road) पाहणी केली. पाहणी केल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Mishal)  म्हणाल्या, जनता वसाहत, पु. ल. देशपांडे उद्यानामागील (P. L. Deshpande Udyan) रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे 15 दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल असे त्यांनी सांगितले.

आमदार माधुरी मिसाळ यांनी विश्रांती नगर रस्ता, विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जागेची पाहाणी केली.

 

यावेळी प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला (Project Head Srinivasa Bonala), पथ विभाग प्रमुख व्ही जी कुलकर्णी (Path Division Head VG Kulkarni), वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित घुले (Traffic Branch Senior Inspector Amit Ghule), सिंहगड वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक  उदयसिंग शिंगाडे (Sinhagad Traffic Department Senior Police Inspector Uday Singh Shingade),
क्षेत्रीय अधिकारी सिंहगड क्षेत्रीय कार्यालय प्रदीप आव्हाड (Regional Officer Sinhagad Regional Office Pradip Awhad),
कार्यकारी अभियंता पथ अमर शिंदे (Executive Engineer Path Amar Shinde), राखी चौधरी (Rakhi Chaudhary),
अतुल कडू (Atul Kadu), कार्यकारी अभियंता प्रकल्प  अजय वायसे (Executive Engineer Project Ajay Vaise),
अधिक्षक अभियंता प्रकल्प सुश्मिता शिर्के (Superintending Engineer Project Sushmita Shirke),
उपअभियंता महादू थोपटे (Deputy Engineers Mahadu Thopte), निखिल रंधवे, विश्वास ननावरे, प्रवीण दिवेकर, विशाल पवार उपस्थित होते.

 

Web Title :- MLA Madhuri Mishal | Alternative road to Sinhagad road will start in 15 days – MLA Madhuri Mishal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

 

आता विना कटकट काढा PF चे पैसे, मिनिटात थेट जनरेट होईल UAN; EPFO ने दिली ही नवी सुविधा

 

Ration Without Ration Card | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन? जाणून घ्या