MLA Mahesh Landge | आमदार महेश लांडगे यांच्याकडे 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी, जीवे मारण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष (BJP Pimpri Chinchwad City President) आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन 30 लाख रुपये खंडणीची (Extortion) मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर खंडणीचा मेसेज आला आहे. मसेजमध्ये खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन (Parivartan Helpline) सुरु केली आहे. या हेल्पलाईनचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या क्रमांकावर मंगळवारी (दि.4) सायंकाळी अज्ञात व्यक्तीने मेसेज केला. 30 लाख रुपयांची खंडणी द्या, अन्यथा पुढील परिणामाला (Pune Pimpri Chinchwad Crime) तयार रहा. खंडणीचे 10 लाख रुपये बँक खात्यात जमा करा आणि उर्वरतित रक्कम एका ठिकाणी असलेल्या गाडीत ठवेा, असा मेसेज आरोपीने पाठवला आहे. तसेच खंडणीची रक्कम दिली नाही तर महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मेसेजमधून दिली आहे. हा मेसेज हेल्पलाईनचे काम करणाऱ्या यश पवार (Yash Pawar) यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास पाहिला.

 

यश पवार यांनी यासंदर्भात बुधवारी (दि.5) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान अशाच प्रकारची धमकी पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे(Avinash Bagway) यांना देण्यात आली आहे.
तसेच यापूर्वी देखील पुण्यातील नेत्यांकडे खंडणी मागितल्याचे प्रकार घडले आहेत.
पुण्यात ज्या प्रकारे खंडणी मागण्यात आली तशीच मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना दिल्याचे समोर आले आहे.

Web Title :-   MLA Mahesh Landge | extortion demand to bhosari mla mahesh landge threatened to kill

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस