जळगाव : …म्हणून वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदाराने बांधले दोरीने

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. याच कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांनी वीज कंपनीचे अभियंता फारूख शेख यांना दोरीने बांधले. याबाबतची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चव्हाण यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार चव्हाण यांच्यासह काही शेतकरी आज (शुक्रवार) वीज कंपनीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर या आंदोलकांनी वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधून ठेवले.

याप्रकरणाची तक्रार संबंधित अभियंत्याने पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक मुंडे हे स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि त्यांनी आमदार चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले.दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर भाष्य केले होते. तरी देखील काही ठिकाणी हा प्रश्न कायम आहे.