MLA Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगासह पोलिसांकडे धमकी दिल्याप्रकरणी तक्रार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे, जर आम्हाला मतदान केले नाही, तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावाला दिला जाणार नाही, असे वक्तव्य आमदार नीतेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी नांदगाव येथे प्रचार सभेत केले होते. त्यानंतर नीतेश राणेंच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर (MLA Nitesh Rane) तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Group) करण्यात आली आहे.

आम्हाला मतदान केले नाही तर निधी देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या आमदार नीतेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी केली आहे. या संदर्भातील राजा म्हसकर यांनी एक निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले आहे. तसेच नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.
या निवडणुकीच्या भाजप पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार रविराज मोरजकर यांचा प्रचार
करण्यासाठी कणकवली मतदार संघाचे आमदार नीतेश राणे ११ डिसेंबर २०२२ रोजी नांदगाव येथे आले होते.
त्यावेळी बोलताना त्यांनी ही धमकी दिली. सदर घटनेचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे.
तरी या वक्तव्यासंबंधी त्यांच्यावर आचार संहिता भंग केल्याप्रकरणी आणि ग्रामस्थांना धमकाविल्या प्रकरणी
गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांनी केली आहे.

Web Title :- MLA Nitesh Rane | file a case against nitesh rane for violation of code of conduct shiv sena demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

Pune Crime | पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाचा बोपदेव घाटात खून

Pune Crime | कोंढव्यातील खंडणीखोर आसिफ खान टोळीवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 114 वी कारवाई