Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ginger-Sore Throat and Pain | आल्याचा वापर अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. याचे अनेक वैद्यकीय फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे ते घशाची खवखव दूर करण्यास मदत करते. घसा खवखवल्यावर तुम्हाला होणारा त्रास हा घशात सूज आणि खाज सुटण्यामुळे होतो. सूज हा संसर्गाप्रति आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाचा परिणाम आहे. अशावेळी आले शरीरातील प्रो-इंफ्लेमेटरी प्रोटीन्स ब्लॉक करण्यात मदत करते. या प्रोटीनमुळे सूज, वेदना आणि खाज सुटते. आले वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते. (Ginger-Sore Throat and Pain)

 

1. सुंठ चावा (Ginger)
घशाच्या खवखवीपासू मुक्त होण्यासाठी तुम्ही सुंठ वापरू शकता. हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळेल. सुंठ सोलून घ्या आणि नंतर एक इंच तुकडा कापून चावा. थोडावेळ चघळून त्याचा रस गिळा.

2. आल्याचा चहा (Ginger Tea)
तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. गरम आल्याचा चहा हा घसा खवखवणे शांत करण्याचा एक लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग आहे. या चहामुळे घशाला आराम मिळतो. तो बनवण्यासाठी एक कप पाण्यात 2 इंच कच्चे आले बारीक करून चहा बनवा. चहा पाच मिनिटे उकळू द्या, नंतर गाळून घ्या. (Ginger-Sore Throat and Pain)

 

3. गरम करून खा आले (Ginger)
खूप घसा दुखत असेल आणि चहा पिऊ शकत नसाल तर आल्याचे छोटे तुकडे करून घ्या.
नंतर भाजून त्यावर काळे मीठ (Black Salt) टाका. काही वेळ तोंडात ठेवून त्याचा रस गिळत राहा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

’गंदी बात’ फेम Gehana Vasisth ने बाथरूममध्ये दिल्या न्यूड पोज, का म्हटले – ’…थकले आता’

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य