MLA Prakash Solanke | माजलगाव जाळपोळ प्रकरण : आमदार सोळंके यांचा खळबळजनक दावा, हल्लेखोरांमध्ये राजकीय…

बीड : MLA Prakash Solanke | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर सोमवारी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भीषण हल्ला करण्यात आला होता. यामध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती, शिवाय इतरही संस्थांना लक्ष्य करण्यात आले होते. याबाबत आज आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. (MLA Prakash Solanke)

आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले की, हल्ला करणाऱ्यांमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांसह माझे राजकीय विरोधक देखील होते, तसेच हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते, त्यांचा उद्देश माझ्या जीवितास बरेवाईट करण्याचा होता. या प्रकरणात सरसकट धरपकड न करता केवळ समाजकंटकांनांच अटक करावी. (MLA Prakash Solanke)

हल्लेखोरांनी सोळंके यांच्या बंगल्यात घुसून आग लावल्यानंतर. सुंदरराव सोळंके महाविद्यालयाकडे जाळपोळ केली होती. त्यानंतर नागरी पतसंस्थेच्या कार्यालयाला आग लावली. त्यानंतर शहरातील नगरपालिका आणि पंचायत समितीची इमारत पेटवून दिली. या घटनेनंतर सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी ४० पेक्षा जास्त आरोपी शोधले आहेत. यांपैकी २१ जणांना अटक केली आहे.

या जीवघेण्या हल्ल्याची माहिती देताना आमदार सोळंके म्हणाले, जमाव माझ्या घराकडे येणार याची माहिती देण्यात आली होती. जमावास भेटून संवाद साधण्याची मी तयारी केली होती. सात ते आठ पोलिस बंदोबस्तावर होते. मात्र, माझ्या घरावर, कार्यालयावर तीनशे फुट दुरवरूनच जोरदार दगडफेक सुरू झाली.

जमावाने तीन चारचाकी, आठ ते दहा दुचाकी, कार्यालयातील साहित्य जाळले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जमावात दोनशे ते तीनशे समाजकंटक होते. यात माझे मागील ३५ वर्षांच्या कारकिर्दीतील राजकीय विरोधक, अवैध धंदे करणारे होते.

सोळंके म्हणाले, हल्लेखोर पूर्ण तयारीत होते, त्यांच्या बॅगेत दगड, पेट्रोल बॉम्ब होते. त्यांचा हेतु मला जीवे मारण्याचा होता.
याप्रकरणी २१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यातील ८ जण इतर समाजाचे आहेत.
माझ्या जीव वाचविणारे देखील मराठा समाजाचे होते. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले असून केवळ हल्ला
करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी.

आमदार सोळंके मराठा आंदोलनाबाबत म्हणाले, सरकारने कशा प्रकारे, किती वेळात मराठा आरक्षण देणार हे जाहीर करावे.
जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून कमीतकमी वेळात सरकारने हा प्रश्न सोडवावा.

सोमवारी माजलगावमध्ये झालेली जाळपोळ आणि इतर घटनांप्रकरणी विविध ५ गुन्ह्यांपैकी
पोलिस उपनिरीक्षक केरबा बाबूराव माकणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र होके,
रामचंद्र डोईजड यांनी सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज व्हायरल करून सोमवारी सकाळी १० वाजता एकत्र
येण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार सोमवारी जमावाने आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा विनापरवाना काढली.
त्यानंतर जमाव सोळंके यांच्या बंगल्यावर पोहोचला. दादाला भेटायचे असे कारण सांगत घरात प्रवेश केला आणि
दगडफेक सुरू केली. यावेळी जमावाने लाठी, काठी, दगड, पेट्रोल बॉम्ब आणि विविध हत्यारांचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. दिलीप उद्धव आगे (तालखेड),
वैभव भार उगले (चिंचगव्हाण), शिवाजी उर्फ गोविंद चिरके, आकाश दत्तात्रय शिंदे, योगेश तुकाराम राऊत (शिवाजीनगर),
कृष्णा शिवाजी पाबळे (जिजामातानगर), अजय अनिल भुलंगे (पाथरूड), अशोक वसंत मंदे, कृष्णा तुकाराम निरडे
(पॉवरहाऊस रोड), नागेश हनुमान पांढरपोटे, प्रशांत पांडुरंग पांढरपोटे (मोगरा) यांचा ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये
समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले