Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले

दगाफटका केला तर मुंबईच्या नाड्या आवळू, जरांगे पाटलांचा इशारा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange Patil-Maratha Reservation | जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो असं त्यांनी जाहिर केलं. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचे सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार (Maharashtra Govt) गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिलं. (Manoj Jarange Patil-Maratha Reservation)

सरकारला दिलेली ही शेवटची वेळ असून काही दगाफटका केला तर मुंबईच्या नाड्या आवळू. चलो मुंबईची घोषणा करुन मुंबई बंद करुन टाकू. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil-Maratha Reservation)

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.

माजी न्यायमूर्तींनी काढलेली समजूत, समजून सांगितलेले कायदेशीर बारकावे
आणि नंतर सरकारच्यावतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिलेले आश्वासन यानंतर जरांगे पाटील
यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला आणखी काही वेळ देत उपोषण सोडण्याची घोषणा केली. समितीने महाराष्ट्रभर काम करुन महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करावं, असं ठरलं आणि ते जरांगे पाटील यांनी मान्य केलं. अर्धवट आरक्षण देऊन आमचा एक भाऊ नाराज होईल, काही करणार नाही.

मराठवाड्यात काम करणाऱ्या समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल तयार करुन
सरकारला दोन महिन्यांत अहवाल द्यावा. यामध्ये रक्ताचे नातेवाईक आणि त्यांची सोयरीक असलेल्या
आणि राज्यातील मागेल त्या गरजवंत मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, असं ठरलं आहे.
त्यानुसार आम्ही सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत देत आहोत, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News-Diwali Bonus | महापालिकेकडील कंत्राटी कामगारांना बोनस
द्यायची जबाबदारी संबधित ठेकेदारांची; महापालिकेने ठेकेदारांना नोटीस बजावल्या