MLA Praniti Shinde | कोण रोहित पवार? काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, प्रणिती शिंदेंनी उडवली खिल्ली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणूक (Assembly Elections) अजून दूर आहे. पण, सोलापूरच्या जागेवरुन काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) आतापासूनच शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो, असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभेबद्दल वक्तव्य केलं होते. त्यांच्या वक्तव्याचा प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी समाचार घेत टीकास्त्र सोडलं.

कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं म्हणत प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी रोहित पवारांना सुनावलं आहे.

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर शाब्दिक आणि आता शारिरीक हल्ले होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार याकडे गाभीर्याने पाहत नाही.
महिला आमदारांवर हल्ले होताता, ती ही एकटे असताना त्या मागचे कारण शोधले पाहिजे.
महिला आमदारांवर असे हल्ले होत असतील तर सर्वमान्यांचे काय, असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते रोहित पवार?

लोकसभा सीट कोणी लढवायची या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या दोन महिन्यात होईल असा माझा
अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिल की राष्ट्रवादीने लढवायची हे देखील त्याच बैठकीत ठरेल, असं
रोहित पवार म्हणाले होते.

Web Title :- MLA Praniti Shinde | congress mla praniti shinde reply to ncp mla rohit pawar statement about solapur election